ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील  पॉडकास्ट!
www.granthpremi.com
हा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे.
फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
                    
                    
                
                Oct 10, 2025
            
            
            
                सर्व जग ज्या योग साधनेला मान्यता देते तिथे आपण भारतीय मात्र योगाकडे काहीसं दुर्लक्ष करतो आणि तथाकथित मॉडर्न आणि महागड्या Zumba / Gym / Pillates च्या मागे धावतो. परदेशामध्ये शालेय शिक्षणात योग अंतर्भूत केला जातोय पण आपल्याकडे मात्र अजूनही त्याबाबतीत औदासिन्य आहे. आपल्याकडे  योग म्हणजे योगासने, हे समीकरण अतिशय घट्ट रुजलेले आहे. पण मग योग म्हणजे नेमके काय?  बरेच वर्षे योग करणार्या लोकांनाही अष्टांग योग कळत नाही. योग आणि ध्यानाच्या मागचे विज्ञान काय आहे? योगामुळे खरेच वजन कमी होते?
योगामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो? प्राणायामामुळे मन:शांती मिळते? योग आणि अध्यात्म याचाही संबंध आहे, तो कसा? या सर्व विषयांवर या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारल्या आहेत 
श्री अनिल फडणवीस सरांबरोबर. फडणवीस सर संत साहित्य अभ्यासक तर आहेतच पण ते योग अभ्यासक आणि योग शिक्षक देखील आहेत. त्यांच्या "आनंद योग - ध्यानासाहित" या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीच्या निमित्ताने निरंजन मेढेकर यांनी हा संवाद साधला आहे.  
अनिल फडणवीस यांनी लिहिलेले आनंद योग पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-  
https://granthpremi.com/products/anand-yog
अथवा खालील नंबर वर संपर्क करा  
WhatsApp Message Only : +91 85509 31939
(स. 10.30 ते स. 6)
            
        00:56:11 
            
		
            
        
                Sep 26, 2025
            
            
            
                कवितेची गोडी विद्यार्थ्यांना लागावी म्हणून अनन्वय संस्थेची सुरुवात झाली. हे विद्यार्थी म्हणजे माझा बँक बॅलेन्स आहे असे माधवी ताई म्हणतात. फर्ग्यूसन कॉलेज मध्ये उत्तम काम सुरू असताना माधवी ताई संहिता लेखन आणि माहितीपट या क्षेत्राकडे वळल्या. 50 महितीपट त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बनवले. त्यामधील कित्येक महितीपटांना राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. या क्षेत्रात कुठलेही शिक्षण न घेता ही किमया त्यांनी कशी साधली? विविध क्षेत्रांमध्ये तितकेच समरसून काम करणे, त्यामध्ये यश मिळवणे, आणि हे करताना आनंदी आणि समाधानी राहणे हे त्यांना कसे जमले? आयुष्याच्या या टप्प्यावरही त्या उपयोजित मराठी हा विषय कॉलेज मध्ये शिकवीत आहेत.. आपल्या मनातून मराठीचा न्यूनगंड आधी गेला पाहिजे , सर्वात आधी आपल्या घरात मराठी वातावरण ठेवणे गरजेचे आहे असे त्यांचे ठाम मत आहे. डॉ. माधवी वैद्य यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग तुम्हाला नवीन दिशा आणि प्रेरणा नक्कीच देवून जाईल. 
What if one woman could master literature, theater, medicine, and film all in one lifetime? Meet Dr. Madhavi Vaidya—a Gold Medalist scholar, celebrated author, and passionate teacher who breathed life into Marathi poetry and drama. Her award-winning documentary “It’s Prabhat” earned the coveted President’s Award. But that’s not all—homeopathy started as a hobby and grew into a 35-year healing journey with a unique, holistic approach. Curious how she balanced it all with grace and grit? Tune in to uncover the secrets behind her extraordinary, inspiring life that will leave you motivated and amazed!
डॉ. माधवी वैद्य यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-  
https://granthpremi.com/collections/dr-madhavi-vaidya
अथवा खालील नंबर वर संपर्क करा  
WhatsApp Message Only : +91 85509 31939
(स. 10.30 ते स. 6)
डॉ. माधवी वैद्य यांची "कवी शब्दांचे ईश्वर" ही दूरदर्शन वर प्रसारित झालेली मालिका पाहण्यासाठी लिंक :- https://www.youtube.com/@aaryacommunicationsvideos1883/videos
            
        00:51:52 
            
		
            
        
                Sep 12, 2025
            
            
            
                १८ व्या वर्षी लग्न झाल्यावर सामान्य मुली हार मानतील पण माधवी ताई हे अजब रसायन आहे, त्यांनी लग्नानंतर शिक्षण (एमए-मराठी) पूर्ण केले, पीएचडी साठी खानोलकरांचे साहित्य या वेगळ्या विषयात गोल्ड मेडल त्यांनी मिळवले, पुढे होमिओपॅथीचा अभ्यास करून त्या प्रॅक्टिस करू लागल्या, जी अजूनही चालू आहे. पुढे फर्ग्यूसन कॉलेज मध्ये मराठी विषयाचे अध्यापन करीत असताना त्यांनी कवितेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनन्वय नावाची संस्था सुरू केली, विविध विषयांवर कित्येक चांगली पुस्तके लिहिली. इथेच त्या थांबल्या नाहीत, पुढे माहितीपटांचे संहिता लेखन आणि दिग्दर्शन याकडे त्या वळल्या. त्यांच्या  "It's Prabhat" या ह्या प्रभात फिल्म वरच्या माहितीपटाला आणि दिग्दर्शनाकरिता "रजत कमल" हे राष्ट्रपती परितोषिक त्यांना मिळाले.  
या पॉडकास्ट एपिसोड मध्ये आपल्या पाहूण्या आहेत जेष्ठ साहित्यिक, अध्यापिका आणि दिग्दर्शिका डॉ. माधवी वैद्य. या पहिल्या भागात त्यांच्या लहानपणापासून ते अनन्वय संस्थेची सुरुवात कशी झाली हा माधवी ताईंचा जीवन प्रवास आपण उलगडणार आहोत. एखाद्याने ठरवले, तर ती व्यक्ती विविध क्षेत्रात फक्त मुशाफिरीच नाही तर प्राविण्यही मिळवू शकते, तेही पूर्ण वेळ नोकरी करता करता, याचे उत्तम उदाहरण म्हणजे माधवी ताईंचे करियर आहे. माधवी ताई त्यांच्या चारही गुरूंचे ऋण मानूनच या गप्पांची सुरुवात करतात. ग्रंथप्रेमी च्या सर्व श्रोत्यांसाठी आणि वाचकांसाठी चुकवू नये असा हा एपिसोड आहे.
            
        00:53:23 
            
		
            
        
                Aug 29, 2025
            
            
            
                कल्याणच्या एका मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या प्रणवला रुईया कॉलेज मधे admission घेतल्यानंतर प्रचंड न्यूनगंड आला होता. ११ सायन्स नंतर  १२ वीला आर्ट्स बदलून घेतल्यावर तो पुढे पत्रकार झाला आणि नंतर तीही नोकरी सोडून फूलटाइम लेखक झाला. या एपिसोड मध्ये आपले पाहुणे आहेत युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रणव सखदेव! काय पहाल या भागात?
* रुईया कॉलेजने काय दिले ?
* पत्रकाराची नोकरी का सोडली? लेखन प्रवास कसं सुरू झाला?
* काळे करडे स्ट्रोक्स वर प्रतिक्रिया आणि टीका 
* हरारी , कलाम यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकाचे अनुवाद करण्याचा अनुभव कसा होता?
* पुस्तकाचे मार्केटिंग का गरजेचे आहे ? 
* सोशल मीडिया वर होणारे लिखाण योग्य आहे का ?
Pranav Sakhdev, award-winning Marathi author and poet, joins us to share his inspiring journey from a modest childhood in Kalyan to literary acclaim. Discover how journalism, college life, and creative discipline shaped his writing, and learn why translation work is transforming Marathi literature. In this candid conversation, Pranav explores balancing creativity with daily life, the evolution of Marathi language, and building connections with readers. Aspiring writers will gain actionable advice on patience, consistency, and finding your voice in today’s digital world. Tune in for fresh insights on modern Marathi literature, storytelling, and the power of perseverance.
लेखक प्रणव सखदेव यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-  
https://granthpremi.com/collections/pranav-sakhdeo-books
            
        01:13:03 
            
		
            
        
                Aug 15, 2025
            
            
            
                आजूबाजूला कित्येक मृत्यू होत असताना माणूस मात्र स्वत: अमर असल्याप्रमाणे वागतो. युधिष्ठीराला हे सर्वात मोठे आश्चर्य वाटले.. या भागात संत साहित्य अभ्यासक आणि लेखक श्री अनिल फडणवीस सर, ज्ञानेश्वरीच्या 8 व्या अध्यायाचे गोष्टीरूप निरूपण करीत आहेत. काय पहाल या भागात ? 
संत ज्ञानेश्वर महाराज मृत्यू आणि पुनर्जन्माबद्दल काय सांगतात?  मृत्यूनंतर सद्गती कशी मिळते ? आजच्या काळातील सर्वसामान्यांना हे का साधले जात नाही ?
मृत्यू संबंधी विज्ञान काय म्हणते ? आपल्याला आणि जवळच्या नातेवाइकाला मृत्यू नंतर सद्यस्थिती कशी प्राप्त होईल ? त्यासाठी काय केले पाहिजे ? 
 छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंत्यसमयी त्यांनी काय केले? 
पूर्वजन्माचे ज्ञान कोणाला असते ? ज्ञानेश्वरीत आठव्या अध्यायाशिवाय इतर ठिकाणी पण  पुनर्जन्माचा उल्लेख आलेला आहे का ? या विषयावर आपल्या संतांनी काय सांगितले आहे?
            
        00:49:39 
            
		
            
        
                Aug 01, 2025
            
            
            
                S*xuality किंवा लैंगिकता हा विषय भारतीय समाजात अजूनही टॅबू मानला जातो, या विषयावर संवाद आणि शिक्षणाची नितांत गरज आहे. या एपिसोड मध्ये आपण चर्चा करतोय 
"देहभान" पुस्तकाचे लेखक निरंजन मेढेकर यांच्याशी. सचिन पंडित यांनी हा संवाद साधला आहे. काय पहाल या भागात?
* लैंगिकता शिक्षण / S*x Education - गरज काय आणि ही जबाबदारी कोणाची? 
* डेटिंग, विवाहपूर्व संबंध, सहजीवन आणि लैंगिक समस्या.. 
* संवादाचा अभाव अनेक सामाजिक आणि वैयक्तिक समस्या कश्या निर्माण करतो ?
* P*rn Addiction चे दुष्परिणाम  काय आहेत ?
* R*pe Mentality काय आहे ?
* जेष्ठांचे सहजीवन का महत्वाचे आहे ?
लेखक निरंजन मेढेकर  यांनी लिहिलेले "देहभान" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-  
https://granthpremi.com/products/dehbhan-book-by-nirnjan-medhekar
#ग्रंथप्रेमी #मराठीपॉडकास्ट  #निरंजनमेढेकर #देहभान #लैंगिकता  #मराठीपुस्तक #लैंगिकताशिक्षण #संवादमहत्वाचा 
#MarathiPodcast #NiranjanMedhekar #Granthpremi #S*xEducation  #WhyConversationMatters  #Dehbhaan #MarathiBook
            
        00:49:12 
            
		
            
        
                Jul 18, 2025
            
            
                 Can Women Really Travel Solo and Be Safe? | माझा ब्रँड आजादी | Dr. Ujjwala Barve | Granthpremi मराठी
            
            
                अनुराधा बेनीवाल या हरयाणवी तरुणीने फक्त १ लाखात अख्खं युरोप पालथं घातलं, ते कसं? हे समजून घेण्यासाठी आपण गप्पा मारतोय "माझा ब्रॅंड आजादी" या पुस्तकाच्या लेखिका (मराठी अनुवाद) डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्याशी.  काय आहे या पॉडकास्टमध्ये ? 
बजेट ट्रॅव्हलची मजा, काउच सर्फिंग काय असते?
एकटीने फिरणं सेफ आहे.. ? 
भारतीय आणि युरोपियन कल्चरमधले गमतीशीर फरक
बायकांचं स्वातंत्र्य आणि प्रवासातून आलेला आत्मविश्वास 
आणि या सगळ्यात अस्सल ‘फ्रीडम’चा शोध. 
हा पॉडकास्ट ऐकला की आयुष्यातली खरी ‘आजादी’ म्हणजे काय हा विचार तुम्ही जरूर कराल अशी आशा करतो !
 
Ever wondered if you could travel Europe on a shoestring budget and find true freedom? This podcast dives deep into the incredible journey of a young Haryanvi woman who explored Europe for a month with just one lakh rupees! It's not just a travelogue; it's a powerful story about independence, self-discovery, and breaking societal norms. We explore how she used budget hacks like couch surfing, faced challenges, and found empowerment. Join us as we discuss societal attitudes towards women's freedom, cultural contrasts, and how travel can truly transform you and set you free. Get ready to rethink what 'Azadi' really means! 
डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी अनुवाद केलेले "माझा ब्रँड आजादी" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-  
https://granthpremi.com/products/maza-brand-aazadi
            
        00:43:21 
            
		
            
        
                Jul 04, 2025
            
            
            
                मंडळी, आपल्या भारताची शान म्हणजे इथली मंदिरं! नुसत्या दगडातून साकारलेली ही वास्तूशिल्पं नाहीत, तर आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि अध्यात्माचा तो एक जिवंत ठेवा आहे. 'गाभारा - मंदिरांचा समृद्ध वारसा' या पुस्तकाचे लेखक, श्री. सर्वेश फडणवीस यांच्यासोबतच्या या गप्पांमध्ये आपण याच मंदिरांच्या अद्भुत विश्वात डोकावणार आहोत.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपासून ते महाराष्ट्र आणि विशेषत: विदर्भातील जुन्या, पण तितक्याच महत्त्वाच्या मंदिरांपर्यंतचा प्रवास आपण करणार आहोत. ही मंदिरं फक्त मूर्ती ठेवण्याची किंवा प्रार्थना करण्याची जागा नव्हे, त्याच्यामागे खोल अध्यात्म दडलेले आहे. ही मंदिरे आणि आपल्या शरीराचे कनेक्शन काय? मंदिरे का पहावीत, त्यांचा नेमका उपयोग काय आणि ती केवळ डोळ्यांनी न पाहता कशी अनुभवायची, हे सर्व आपण सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तरुण पिढीला आपल्या समृद्ध वारशाची ओळख करून देणारी आणि मंदिरांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देणारी ही मुलाखत नक्की बघा. हिंदू संस्कृती, अध्यात्म, इतिहास किंवा मराठी साहित्याची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी ही पर्वणी ठरावी अशी आशा करतो. 
Dive deep into the fascinating world of Indian temples with Sarvesh Fadanvis, author of 'Gabhara'. In this exclusive interview, we explore the spiritual, historical, and architectural significance of temples, from the recent Ram Mandir Pran Pratishtha to the ancient sites of Maharashtra and Vidarbha. Discover what temples truly represent, their connection to the human body, and how to experience their hidden power beyond just viewing the idol. This discussion offers a fresh perspective on sacred spaces and India's rich heritage. Perfect for anyone interested in Hindu culture, spirituality, history, or Marathi literature. Don't miss this insightful conversation!
            
        01:00:19 
            
		
            
        
                Jun 20, 2025
            
            
            
                आजच्या धावपळीच्या जगात माणसाकडे पैसा, साधने आणि सुविधा असतानाही, खरे सुख आणि समाधान आहे का? शांती फक्त वृद्धांसाठी गरजेची आहे, की तरुणांना आणि आजच्या पिढीला तिची जास्त गरज आहे? ती मिळवण्याचा सोपा मार्ग कोणता ? माऊलींच्या हरिपाठाचे प्रयोजन काय? संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ आजही सर्व पिढ्यांना कसा उपयोगी आहे ? या भागात ऋचा थत्ते यांनी संवाद साधला आहे गोष्टीरूप हरिपाठ पुस्तकाचे लेखक श्री अनिल फडणवीस यांच्याशी! माऊलींचा हरिपाठ, अध्यात्म, ध्यान हा विषय जरी जड वाटला तरी तो सोप्या समजेल अश्या गप्पागोष्टींच्या माध्यमातून सोपा करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. काय पाहाल या भागात? 
हरिपाठ आजही relevant का आहे?
संसारात राहून नामसाधना का करावी? 
नामसाधनेचा मार्ग सोपा का आहे?  
तरुणांसाठी हरिपाठाचे महत्व 
हरिपाठातील पहिल्या आणि नवव्या अभंगाचा गूढार्थ
सद् गूरूचे महत्व आणि ध्यानाचे फायदे 
द्वैत-अद्वैत म्हणजे काय?
Unlock true happiness and peace in today’s fast-paced world! In this episode, we dive into the big question: Even with money and comforts, do we really feel satisfied? Discover why inner peace isn’t just for the elderly—youth and all generations need it now more than ever. Learn the simple, practical path to lasting fulfillment through Saint Dnyaneshwar Maharaj’s Haripath, explained in an easy, relatable way.
Join Rucha Thatte in conversation with Anil Phadnavis, author of "Goshtiroop Haripath," as they break down spirituality, meditation, and Haripath’s timeless wisdom for everyday life. You’ll find out:
- How Haripath remains relevant today
- Why and how to practice name chanting in daily life
- The power of Haripath for youth and the benefits of focused practice
- The deeper meaning behind the first and ninth abhangas
- The importance of a true Guru, meditation, and understanding duality vs. non-duality
Don’t miss this episode if you want practical tips for inner strength, clarity, and positivity—no matter your age!
            
        00:52:06 
            
		
            
        
                Jun 06, 2025
            
            
            
                वयाच्या ७३ व्या वर्षीही ज्यांच्या पायात ट्रेकिंगची उमेद आणि हातात लेखणीची ताकद आहे, असे दिलीप नाईक निंबाळकर आज आपल्यासोबत आहेत. एक अनुभवी गिर्यारोहक, पुरस्कार विजेते लेखक आणि गिरीप्रेमीचे सह-संस्थापक... त्यांची ओळख एवढीच नाही. या गप्पांमध्ये आपण ऐकणार आहोत त्यांचा डोंगरांपासून सुरू झालेला आणि शब्दांपर्यंत पोहोचलेला विलक्षण प्रवास, गिर्यारोहणाचे अनुभव, त्यातून मिळालेले जीवनविषयक धडे आणि हे अनुभव त्यांनी लेखणीतून कसे गुंफले? आजच्या सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या कथांमधून रोष का जाणवतो? डोंगर आणि माणसं वाचणारा हा अवलिया आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल.  त्यांचा हा प्रवास आणि विचार ऐकण्यासाठी हा भाग नक्की पहा. 
Imagine still trekking, writing, and reading avidly at 73! Meet Dilip Naik Nimbalkar, our incredible guest on this episode.
He's not just an experienced mountaineer who has explored the Himalayas and Sahyadri, but also an award-winning author and co-founder of the renowned Giripremi mountaineering institute in Maharashtra.
In this inspiring chat, Dilip shares his unique journey – how his adventures in the mountains shaped his life and led him to writing. Discover the powerful life lessons learned from trekking and climbing, and how they translate directly into his impactful books and realistic short stories that tackle social issues head-on.
If you're fascinated by mountaineering, the writing process, or simply looking for life inspiration, you don't want to miss this conversation.
            
        00:43:04 
            
		
            
        
                May 23, 2025
            
            
            
                बाजीरावांनी सिध्याचा नायनाट कसा केला? थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या राजपुताना भेटीचे महत्व काय? या diplomatic भेटीतून त्यांनी नेमके काय साधले? राधाबाईंची काशीयात्रा कशी सफल झाली?  यात्रेसाठी उभ्या हिंदुस्तानातून शत्रूने देखील राधाबाईना संरक्षण का दिले? बाजीरावांनी थेट दिल्लीला धडक दिली आणि बादशाहाचा पराभव कसा केला? बादशहाला हरवले पण दिल्ली घेतली नाही, का ? हे सर्व जाणून घेवूया "देवयोद्धा" या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याकडून, ग्रंथप्रेमी पॉडकास्ट वर, थोरले बाजीराव पेशवे विशेष मालिकेच्या पाचव्या भागात!
            
        01:09:08 
            
		
            
        
                May 09, 2025
            
            
            
                पालखेडच्या युद्धानंतर बाजीरावांच्या महत्वाच्या लढाया म्हणजे अमजेरा (माळवा), बुंदेलखंड आणि डभईची लढाई. प्रत्येक लढाईची कारणे, त्या वेळची परिस्थिती काय होती, अंतर्गत आणि बाह्य राजकारण काय होते आणि प्रत्येक लढाईत काय युद्धनीती वापरली गेली, परिणाम काय झाले, स्वराज्य विस्ताराच्या दृष्टीने या लढायांचे महत्व काय होते? , यातली 1 लढाई ही छत्रपती शाहू महाराजांच्या अस्तित्वाच्या लढाई का होती? हे सर्व जाणून घेवूया "देवयोद्धा" या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याकडून ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या चौथ्या भागात!
#Granthpremi  #MarathiPodcast #marathahistory #Devyodha #ThorleBajiraoPeshve #BajiraoPeshwa #KakaVidhate #BattleOfAmjera 
#BattleOfBundelkhand #BattleOfDabhai #MarathaEmpire #PeshwaBajirao
#बाजीरावपेशवे #मराठीसाम्राज्य #बाजीराव #काकाविधाते #मराठ्यांचाइतिहास #डभई #बुंदेलखंड #अमजेरा #माळवा #बाजीरावांच्यालढाया #ग्रंथप्रेमी #मराठीपॉडकास्ट #देवयोद्धा #थोरलेबाजीरावपेशवे
            
        01:00:30 
            
		
            
        
                Apr 25, 2025
            
            
            
                पालखेडचे युद्ध जिंकल्यानंतर थोरल्या बाजीरावांची कीर्ती भारतभर पसरली व इथून दख्खन/माळव्यात मराठा साम्राज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली! श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेणार्या या पॉडकास्ट च्या मालिकेतील हा तिसरा भाग. या भागात आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" (बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील कादंबरी) कादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी आणि विषय आहे पालखेडचा रणसंग्राम! काय पहाल या तिसर्या भागात ? :-
पालखेड लढाईच्या वेळी परिस्थिती काय होती? 
स्वराज्यावरचे हे आक्रमण पूर्वीच्या आक्रमणांपेक्षा वेगळे कसे होते?
निजामाने शाहू महाराजांच्या दरबारातले बरेचसे सरदार / मंत्री फितवले आणि आपल्या बाजूने वळवले, ते कसे ?  
त्याने दरबारातले  सरदार आणि बाजीराव यांच्यामध्ये दुरावा कसा वाढवला? 
निजामाचे राजकारण आणि खेळया काय होत्या ? 
पालखेडच्या लढाई मागची कारणे काय होती? 
निजाम विरुद्ध बाजीराव हा सामना कसा विषम होता.. बाजीरावांपुढे काय अडचणी होत्या? 
बाजीरावांनी या युद्धात काय रणनीती वापरली? 
युद्धाचा आराखडा काय होता? कुठले डावपेच आणि व्यूह रचले गेले? 
पालखेडची लढाई ही जगातल्या उत्कृष्ट लढयांपैकी एक का मानली जाते.. ?
युद्धशास्त्रीय दृष्टिकोणातून पालखेडच्या लढाईचे महत्व काय.. ?
या युद्धाबद्दल आणि बाजीरावांबद्दल भारतीय आणि परकीय इतिहासकार काय म्हणतात?
बाजीरावांची तुलना  जगातल्या थोर सेनापतींशी का केली जाते?
            
        00:44:04 
            
		
            
        
                Apr 11, 2025
            
            
            
                संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचा दरारा आणि दहशत निर्माण करणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेणार्या या पॉडकास्ट च्या मालिकेतील हा दूसरा भाग. या episode मध्ये आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" या बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी. काय पहाल या दुसर्या भागात ? :-
मराठ्यांना मुलुखगिरी  ( चौथाई / सरदेशमुखी वसूल ) का करावी लागत होती ? 
त्याला काही लोक लूट किंवा खंडणी असे चुकीचे नाव का देतात? 
बाजीराव सेनापती म्हणून कसे होते? 
निजामाचा स्वभाव कसा होता?  
निजाम आणि बाजीरावामधला फरक काय?  
निजाम औरंगजेबापेक्षा श्रीमंत होता? 
दिल्लीच्या बादशहापासून ते सगळे मोगल सरदार बाजीरावाला का घाबरत होते? 
भारतात भूमिपुत्रांचा इतिहास कसा आणि का दडपला गेला? 
इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून घेतला मुघलांकडून नाही..
पालखेडची लढाई ही  जगातील सर्वश्रेष्ठ 10 लढायांपैकी एक मानली जाते.
या पालखेड लढाईच्या आधी काय परिस्थिती होती? निजाम कसा वागला? 
पुस्तका सदर्भात आधिक माहितीसाठी पुस्तकाची लिंक -> 
https://granthpremi.com/products/devyoddha
Credits: 
Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
            
        01:00:05 
            
		
            
        
                Mar 28, 2025
            
            
            
                थोरले बाजीराव म्हणजे शौर्याचा सागर आणि प्रचंड विजयांचा धनी असलेला अजेय, अपराजित पेशवा ! मराठ्यांच्या मनात साम्राज्याचं स्वप्न पेरणारा !  साध्या बाजीगर शिलेदारांतून जयवंत सरदार घडवणारा ! हिंदुस्थानात मराठी फौजा तुफानासारख्या नाचवणारा ! दिल्लीवर धडक मारून बादशाही तख्त त्याने हादरवलं. 
दख्खनेत दंडेली करणाऱ्या निजामाची नांगी ठेचली. कोकणात लष्कर घालून सिद्दी आणि फिरंग्यांची कंबरडी मोडली. इंग्रजांना धडकी भरवली. शत्रूच्या सामर्थ्य नि शक्तीच्या फळ्या फोडून सर्वत्र मराठ्यांचा दरारा निर्माण केला.  केवळ 20 वर्षांच्या अल्प काळात हे मन्वंतर घडवलं. 
या आणि येणार्या काही episodes मध्ये आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी. विषय आहे थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्व. या पहिल्या भागात आपण खालील मुद्दे कवर केले आहेत : 
औरंगजेबाचा मृत्यू , छत्रपती शाहू महाराज यांची सुटका,  छत्रपती शाहू महाराज आणि ताराराणी यांचा संघर्ष , मराठी सरदारांची द्विधा मनस्थिती, बाळाजी विश्वनाथ यांना सेनाकर्ते ही जबाबदारी का दिली गेली? बाळाजी विश्वनाथ यांचा पेशवे म्हणून कार्यकाळ कसा होता ? थोरल्या बाजीरावांनी जेव्हा पेशवेपदाची सूत्रे हाती घेतली तो काळ कसा होता? त्याच्या समोर काय आव्हाने होती? 
या विडियो मध्ये सांगण्याच्या भरात २ तारखा चुकल्या आहेत त्याची दुरूस्ती खालील प्रमाणे : 
१ )  बाजीराव यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०८ असा सांगितला आहे. तो १८ ऑगस्ट १७०० असा पाहिजे. (स्क्रीनवर दुरूस्ती केली आहे)
२) १७ नोव्हेंबर १७०७ अशी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पद मिळाल्याची तारीख सांगितली आहे. ती १७ नोव्हेंबर १७१३ अशी पाहिजे. (स्क्रीनवर दुरूस्ती केली आहे)
Credits: 
Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
देवयोद्धा त्रिखंडात्मक कादंबरीच्या दुसर्या सुधारित आवृत्तीचे छपाई काम सध्या सुरू आहे. ही आवृत्ती prebook करण्यासाठी खालील लिंक वापरुन आपली मागणी नोंदवा :  
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScToia5ck8VBVgM_vgh8OQpsiItU_d3qmcBOjoE19a6WVzbiA/viewform?usp=header
पुस्तका सदर्भात आधिक माहितीसाठी पुस्तकाची लिंक -> 
https://granthpremi.com/products/devyoddha
Connect with us: 
Instagram:   https://instagram.com/granthpremi
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi  #MarathiPodcasts #marathahistory #Devyodha #ThorleBajiraoPeshve
            
        00:57:32 
            
		
            
        
                Mar 14, 2025
            
            
            
                नचिकेत हे  एक उत्तम पॉडकास्टर आणि पॉडकास्टिंग कोच आहेत. त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती घेतल्या आहेत. शेकडो लोकांना पॉडकास्ट हा विषय शिकवला आहे. या त्यांच्या प्रवासात त्यांना जे सापडले ते सोने होते. त्यामध्ये लोकांना बदलण्याची त्यांच्या mindset वर काम करण्याची ताकत आहे. 
आणि हे सर्व ग्यान (learnings) त्यांनी "जो जे वांछील" या कादंबरी मध्ये गुंफले आहे. कसा होता "जो जे वांछील" कादंबरी घडण्याचा प्रवास ? स्वप्नांचा पाठलाग करणार्या "अनिकेत" या त्यांच्या कादंबरीच्या नायकाप्रमाणे, त्यांना काय अडचणी आल्या? बोली भाषेतील या पुस्तकाला लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत? कादंबरीच्या प्लॉट ला काही लोके का जज करताएत?  या एपिसोड मध्ये, पोर्णिमा या एका पॉडकास्टर ने दुसर्या पॉडकास्टर शी साधलेला संवाद, तो ही पॉडकास्ट मधून जन्मलेल्या पुस्तकासाठी, हे खूप रंजक आहे!
Nachiket is a seasoned podcaster and a podcasting coach turned Author!
He has interviewed 100+ experts and achievers from different walks of life and coached many podcasting enthusiasts.He has evolved as a human being at a much faster pace compared to others due to his podcasting journey.He has incorporated his self help learnings, experiences and value nuggets from his journey  into a fiction called "Jo Je Vanchil" in Marathi language. Pornima a fellow podcaster is talking to him in this episode to understand more about this book and how the book has the capacity to change people by working on people's mindset. 
"जो जे वांछील" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :  
https://granthpremi.com/products/jo-je-vanchil
Credits: 
Guests: Nachiket Kshire  (Writer, Podcaster)
Hosts: Pournima Deshpande  (IT Professional, Actor, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Produced by: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer: 
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
            
        00:52:58 
            
		
            
        
                Feb 28, 2025
            
            
            
                देवराई म्हणजे नुसते देवळाभोवती लावलेले जंगल नाही. देवराईला परंपरा आहे, संस्कृती आहे, श्रद्धा आहेत, गूढ गोष्टी आणि हकिकती आहेत. लोकांच्या मनात देवराईबद्दल भीती, आदर आणि प्रेम देखील आहे. ते का ? देवराई निसर्गाला आणि समाजाला कशी जोडते ? या एपिसोड मधे, देवराई हा विषय समजून घेण्यासाठी आपण "देवराई आख्यान" या पुस्तकाच्या लेखिका आणि AERF संस्थेच्या संस्थापक अर्चना जगदीश, यांच्याशी गप्पा मारल्या आहेत.
अर्चना जगदीश यांनी जंगल वाचवण्यासाठी आपला सरकारी जॉब सोडला. अर्चना आणि AERF टीम, गेली 30 वर्षे देवराई अभ्यास, संशोधन, जंगल जतन आणि संवर्धनाचे काम भारतात करीत आहे. त्यांनी आजवर 9500 एकर पेक्षा जास्त जंगले जतन आणि संवर्धन केली आहेत. त्यामधून कित्येक रोजगार देखील निर्माण झालेत. देवराई हा विषय आणि AERF च्या कामाचा impact हे सर्व जाणून घेवूया या podcast मधे!
What is a Sacred grove or Devrai? It's not just a forest built around a temple. Lets understand this subject in detail with Archna Jagdish who is an Author of the book "Devrai Akhyaan", a reference book in Marathi on Sacred groves! She is also a founder of AERF (Applied Environmental Research Foundation) that works in India to conserve forests! They have conserved more than 9500 Acres of jungle so far, they work with local communities to conserve forests in a sustainable manner. In the process they have also been able to create many jobs! Lets understand this subject and the impact of their work in this podcast!
Connect with Archana:
Linked In :   / archana-godbole-8372a94  
Know More About AERF - https://www.aerfindia.org
"देवराई आख्यान" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com/products/devr...
"नागालँडच्या अंतरंगात" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com/products/naga...
Credits:
Guests: Archana Jagdeesh (Founder - AERF, Author - Devrai Akhyaan)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram:   / granthpremi  
Facebook:   / granthpremi  
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV...
Email: contact@granthpremi.com
            
        01:11:14 
            
		
            
        
                Feb 14, 2025
            
            
            
                AI Technology ही इतर Technologies पेक्षा नेमकी वेगळी कशी ? एआय खोटे बोलू शकतो? सगळ्यांचे Jobs खरेच धोक्यात आलेत का? सामान्य माणसाने एआय शिकणे का गरजेचे आहे? Generative AI म्हणजे काय? AI agents काय असतात? Security आणि कॉपीराइट बद्दल काय धोका निर्माण झाला आहे AI मुळे. सामान्य माणसाने एआय टूल्स कशी शिकावीत? डाटा सायन्स का महत्वाचे आहे? Resposible AI आणि कायद्यांची गरज काय ? सूचिर बालाजी आत्महत्या प्रकरण काय आहे ? Character.ai वर एका आईने खटला दाखल का केला ? ग्रंथप्रेमी पॉडकास्टच्या या एपिसोड मध्ये, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत डाटा सायंटिस्ट पीयूष कुलकर्णी यांनी. पीयूष हे डाटा सायन्स पुस्तकाचे लेखक आहेत आणि ते जर्मनी मधील एका आंतराष्ट्रीय कंपनी मध्ये काम करतात. बर्याच एआय 
प्रोजेक्टस वर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. 
How is AI different from other technologies? Can AI lie? Are jobs really at risk? Why should non tech people
learn AI and how? What is Generative AI? What are AI agents? What is the harm posed to security and copyright because of AI?Why is data science important? What is the need of Responsible AI and global acts ? What is Suchir Balaji suicide case? Why did a mother sue character.ai? In this episode of Granthpremi podcast, we spoke to a Germany based data scientist Piyush Kulkarni to find answers to all our questions on AI and data science!
Connect with Piyush Kulkarni: 
Linked In : https://www.linkedin.com/in/piyush-kulkarni-12502480/
Facebook: https://www.facebook.com/piyush.kulkarni.108
Instagram: https://www.instagram.com/balanced_banda
Email: datascientistpiyushkulkarni@gmail.com
Piyush's Blog: https://medium.com/@piyush-kulkarni
Courses by Piyush: 
Statistics - https://i4dible.thinkific.com/
Database - https://www.udemy.com/course/database_marathit/
"डाटा सायन्स" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :  
https://granthpremi.com/products/data-science
Credits: 
Guests: Piyush Kulkarni (Data Scientist based in Germany, Author)
Hosts: Niranjan मेढेकर (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer: 
पॉडकास्टमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  
Connect with us: 
Twitter:  https://x.com/granthpremi
Instagram:  https://instagram.com/granthpremi
Facebook:  https://www.facebook.com/Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #piyushkulkarni  #datascience #AI  
            
        01:09:10 
            
		
            
        
                Jan 31, 2025
            
            
            
                मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (Retd). यांना Lady Officer म्हणून लष्करातील कामाचा अनुभव तर आहेच शिवाय त्या एक उत्तम लेखिकाही आहेत. त्यांनी लिहीलेल्या "अपराजिता - गाथा भारतीय वीरांगंनांची" - या ग्रंथात, गेल्या 2000 वर्षामधील भारतातील काही निवडक रणरागिणीचा / वीरांगनाचा संक्षिप्त इतिहास त्यांनी उलगडून दाखवला आहे. याच विषयाला अनुसरून त्यांच्याशी संवाद साधला आहे नचिकेत ने आणि राणी नागानिका , राणी दिद्दा , राणी रुद्रम्मा, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी या काही विरांगंनाबद्दल या गप्पा रंगल्या आहेत. या स्त्रियांच्या धैर्य, त्याग आणि बलिदानाच्या कथा आजवर इतिहासाच्या पानांतच दडून राहिल्या. पण या पुस्तकाच्या निमित्ताने हा इतिहास आणि या स्त्रियांचे कर्तृत्व पुन्हा एकदा लोकांच्या समोर येत आहे.
Major Mohini Garge Kulkarni (Retd.) not only has experience of working in the army, She is also a good writer. In her book 'Aparajita - Gatha Bharatiya Virangananchi", She has narrated a brief history of some selected female warrier queens of India from last 2000 years. Nachiket has spoken to her on this subject and talked about Rani Naganika, Rani Didda, Rani Rudramma, Ahilyadevi Holkar and Tararani. The stories of courage, sacrifice and strength of these women are still buried in the pages of history. But due to this book, this history and the achievements of these women are once again coming in front of the people.
Connect with Major Mohini Garge Kulkarni:
Facebook: https://www.facebook.com/mohini.gargekulkarni
Instagram: https://www.instagram.com/gargekulkarni/
Email: mohinigarge2007@gmail.com
"अपराजिता - गाथा भारतीय विरांगनांची" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :
https://granthpremi.com/products/aparajita-gatha-bhartiya-viranganachi
Credits:
Guests: Major Mohini Garge Kulkarni Retd. (Retd Army Officer, Author)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: https://instagram.com/granthpremi
Facebook: https://www.facebook.com/Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #majormohinigargekulkarni #aparajitabook
00:00 - Introduction
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
            
        01:04:32 
            
		
            
        
                Jan 17, 2025
            
            
            
                आजची आपली पाहुणी खास आहे. Skin show / Dance करून millions मध्ये views घेण्याच्या Influencers च्या गर्दीत, ही मुलगी मात्र "मराठी पुस्तके" या niche मध्ये स्वत:ची ओळख Book Instagrammer म्हणून निर्माण करतीये. तिचे 2.30 लाखाहून अधिक followers आहेत जे तिचे फक्त कंटेंट बघत नाहीत तर तिने सुचवलेली पुस्तके विकत देखील घेतात. कित्येक लोकांनी पुस्तक वाचन तृप्ती मुळे सुरू केले आहे. या एपिसोड मधे आपण तिच्याबरोबर मराठी पुस्तके, Instagram, वाचन आणि तरुण पिढी या विषयांवर गप्पा मारल्या आहेत.
In today's age of mindless scrolling, where influencers are minting millions of views by showing their skin or doing dance reels, our guest Trupti Munde has carved her own path as "Marathi Books Instagrammer" with 2.30 + lakh followers. She is promoting reading culture, motivating people to buy books and also suggesting them some good books. In this episode we sit down with Trupti to talk about her journey, reading habit and how she is influencing many people to start their reading journey.   
Connect with Trupti: 
Instagram:  https://instagram.com/readers_dias/
Youtube:  https://www.youtube.com/@readers_dias
वेगवेगळी पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :  
https://granthpremi.com
Credits: 
Guests: Trupti Munde (Marathi Books Influencer / Instagrammer)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Disclaimer: 
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही 
कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  
Connect with us: 
Twitter:  https://x.com/granthpremi
Instagram:  https://instagram.com/granthpremi
Facebook:  https://www.facebook.com/Granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV
Email: contact@granthpremi.com
#Granthpremi #MarathiPodcasts #truptimunde #readers_dias #marathibookstagrammer
00:00 - Introduction
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
            
        00:39:03 
            
		
            
        