Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
साहित्य, होमिओपॅथी, कला ते माहितीपट - विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारी अवलिया  | Dr. Madhavi Vaidya on Granthpremi Podcast

00:53:23
Report
१८ व्या वर्षी लग्न झाल्यावर सामान्य मुली हार मानतील पण माधवी ताई हे अजब रसायन आहे, त्यांनी लग्नानंतर शिक्षण (एमए-मराठी) पूर्ण केले, पीएचडी साठी खानोलकरांचे साहित्य या वेगळ्या विषयात गोल्ड मेडल त्यांनी मिळवले, पुढे होमिओपॅथीचा अभ्यास करून त्या प्रॅक्टिस करू लागल्या, जी अजूनही चालू आहे. पुढे फर्ग्यूसन कॉलेज मध्ये मराठी विषयाचे अध्यापन करीत असताना त्यांनी कवितेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अनन्वय नावाची संस्था सुरू केली, विविध विषयांवर कित्येक चांगली पुस्तके लिहिली. इथेच त्या थांबल्या नाहीत, पुढे माहितीपटांचे संहिता लेखन आणि दिग्दर्शन याकडे त्या वळल्या. त्यांच्या "It's Prabhat" या ह्या प्रभात फिल्म वरच्या माहितीपटाला आणि दिग्दर्शनाकरिता "रजत कमल" हे राष्ट्रपती परितोषिक त्यांना मिळाले. या पॉडकास्ट एपिसोड मध्ये आपल्या पाहूण्या आहेत जेष्ठ साहित्यिक, अध्यापिका आणि दिग्दर्शिका डॉ. माधवी वैद्य. या पहिल्या भागात त्यांच्या लहानपणापासून ते अनन्वय संस्थेची सुरुवात कशी झाली हा माधवी ताईंचा जीवन प्रवास आपण उलगडणार आहोत. एखाद्याने ठरवले, तर ती व्यक्ती विविध क्षेत्रात फक्त मुशाफिरीच नाही तर प्राविण्यही मिळवू शकते, तेही पूर्ण वेळ नोकरी करता करता, याचे उत्तम उदाहरण म्हणजे माधवी ताईंचे करियर आहे. माधवी ताई त्यांच्या चारही गुरूंचे ऋण मानूनच या गप्पांची सुरुवात करतात. ग्रंथप्रेमी च्या सर्व श्रोत्यांसाठी आणि वाचकांसाठी चुकवू नये असा हा एपिसोड आहे.

साहित्य, होमिओपॅथी, कला ते माहितीपट - विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारी अवलिया | Dr. Madhavi Vaidya on Granthpremi Podcast

View more comments
View All Notifications